ज्ञानदीप विद्यालयात फॅन्सी ड्रेस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद,सुमारे ९९ विद्यार्थ्यांचा सहभाग
स्पर्धेचा शुभारंभ जेष्ठ अध्यापक सतीश मुळे व जेष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. इंग्लिश मिडियम स्कूलचे समन्वयक प्रा.के.बी.काळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक महेश पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या अनिता मारकळी यांनी स्वागत केले. मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन केल्या जाते.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेत इंग्लिश स्कूल मधील नर्सरी, एल.के.जी. यू.के.जी. इयत्ता पहिली ते चौथी असे एकूण ९९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, सदरच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मुलांनी सादर केलेले म्हाळसा, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, गावचा पाटील, डॉक्टर, इंजिनिअर, राधा, मुक्ताबाई, मिस इंडिया, परी, भाजीवाली, फुगेवाला,सैनिक अशी वेशभूषा सादर करून सर्वांनाच आकर्षित केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सतीश मुळे, वंदना साठे यांनी काम पाहिले. कोमल शिंदे यांनी सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.
