Breaking News

उज्ज्वला योजनेंतर्गत महाराष्ट्रात १७ लाख गॅस कनेक्शन


प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’अंतर्गत देशात ३ कोटीहून अधिक गॅस जोडणी करण्यात आली आहे. जानेवारी २०१८ पर्यंत महाराष्ट्रात १७ लाखाहून अधिक गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत.
देशातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील महिलांना गॅस जोडणी देणाऱ्‍या ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा’ शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १ मे २०१६ रोजी केला. देशातील ५ कोटी दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला एलपीजी गॅस जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्रात या योजनेचा शुभारंभ ऑक्टोबर २०१६ मध्ये झाला. गेल्या १५ महिन्यांच्या कालावधीत राज्यात १७ लाख १२ हजार ४२५ गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत. मार्च२०१७ अखेर महाराष्ट्रात ८ लाख ५८ हजार ८०८ कनेक्शन देण्यात आली होती, गेल्या १०महिन्यात सुमारे ९ लाख गॅस कनेक्शन देण्यात आली आहेत