Breaking News

संत भगवानबाबा पुण्यतिथी देवराईत साजरी.


पाथर्डी/ शहर प्रतिनिधी/- पाथर्डी तालुक्यातील देवराईमध्ये संत भगवानबाबा यांची ५३ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी संत भगवानबाबांच्या प्रतिमेची मिरवणूक गावामधून काढण्यात आली. तसेच ह.भ.प. शिवाजी महाराज फुंदे यांचे जाहीर हरिकीर्तन झाले.
तरुणांनी एकत्र येऊन चांगले काम करावे, सामाजिक, धार्मिक कामामध्ये सहभागी व्हावे, आई वडिलांची सेवा करावी असा संदेश यावेळी ह.भ.प. शिवाजी महाराज फुंदे यांनी दिला. यावेळी ग्रामस्थांनी लोकसहभागातून महाप्रसादाचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी प्रा. सचिन पालवे, विष्णू पालवे, योगेश पालवे, राहुल ढाकणे, निलेश पालवे, श्रीकृष्ण पालवे, अशोक पालवे, ऋषिकेश पालवे, दिगंबर पालवे,संतोष खाडे, कारभारी खेडकर या तरुणांचे तसेच सर्व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले अशी माहिती प्रा. सचिन पालवे यांनी दिली.