शेतमालाच्या किमतीबाबत राज्यांच्या शिफारसींचा केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने गांभीर्याने विचार करावा - पांडुरंग फुंडकर
खरीप 2018 साठीच्या कृषीमालाच्या किमतीबाबत पश्चिम क्षेत्रीय राज्यांच्या प्रतिनिधींची बैठक येथील सह्याद्री अतिथीगृहात संपन्न झाली. त्यावेळी श्री. फुंडकर बोलत होते. बैठकीस सहकार मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष विजय शर्मा, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, गुजरातचे कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव व्यास, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांच्यासह राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश येथील कृषी विद्यापीठाचे संशोधक, अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
