| नवी दिल्ली, दि. 27, जानेवारी - प्रजासत्ताक दिनी राजपथावर छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळ्याने देशाचे लक्ष वेधून घेतले. ‘तेज तम अंस पर । कान्ह जिमि कंस पर। त्यों मलिच्छ बंस पर । सेर सिवराज है । या कविराज भूषण यांच्या वीररसाने भरलेल्या काव्याचा उद्घोष करत शिवरायांची किर्ती सांगणारा महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावर दाखल झाला. यावेळी राज्यपथावर राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे सहकुटुंब उपस्थित होते. महाराष्ट्राचा चित्ररथ येताच संभाजीराजे उभे राहिले आणि त्यांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या. |