अर्भक मृत्यूदर जाणीव जागृती-प्रशिक्षण; आरोग्य विभाग, जॅान्सन ण्ड जॅान्सन यांच्यात करार
मुंबई, दि. 12, जानेवारी - आरोग्य विभाग आणि जॅान्सन ण्ड जॅान्सन यांच्यात आज राज्यातील आरोग्य क्षेत्रामध्ये क्षयरोग, माता व बाल मृत्यू यासंदर्भात जाणीव जागृती आणि आशा व एएनएम यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. मंत्रालयात आरोग्य मंत्री डॅा. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला.
यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॅा. प्रदीप व्यास, राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त संजीव कुमार, जॅान्सन ण्ड जॅान्सनचे कार्यकारी संचालक सुशोभन दासगुप्ता उपस्थित होते.यासंदर्भात माहिती देताना आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले, राज्यातील खाण कामगार व त्यांच्या कुटुंबियांना होणार्या क्षयरोगाबाबत प्रचार व प्रसार आणि उपाय योजना क रण्यासाठी जॅान्सन ण्ड जॅान्सन राज्य शासनाच्या आरोग्य विभागाला मदत करणार आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये अर्भक व माता मृत्यू दर जास्त आहे. अशा जिल्ह्यांमधील प रिचारिका आणि आशा कार्यकर्ती यांना नवजात अर्भकाची काळजी, गोल्डन-मिनीटमध्ये त्याला मिळणारा उपचार यासंदर्भात जॅान्सन ण्ड जॅान्सन आरोग्य विभागाच्या मदतीने क ौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार आहे. गरोदरपणात होणारे संसर्गजन्य आजार यासंदर्भातही जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.