Breaking News

सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सवात अडीच कोटींची उलाढाल

सातारा, दि. 12, जानेवारी - सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीच्या वतीने यावर्षी आयोजित केलेल्या 19 व्या ग्रंथमहोत्सवात 5,6,7, व 8 जानेवारी या चार दिवसाच्या क ाळात एकूण 100 स्टॉलवर सुमारे अडीच कोटी रूपयाची पुस्तकांची विक्री होवून उलाढाल झाल्याची माहिती सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीचे कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.


सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीचे अध्यक्ष शंकर सारडा, कार्यवाह प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, कार्यवाह प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे, कार्यवाह शिरीष चिटणीस, उपाध्यक्ष वि.मा.लांडगे, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, प्रा. साहेबराव होळ, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, शिक्षणाधिकारी देवीदास कुल्लाळ, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव व स्वागत समितीचे सर्व सदस्य यांनी ग्रंथमहोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी निटनेटके संयोजन केले होते. 

पुणे,सातारा, सांगली, बारामती, कोल्हापूर, कराड, सोलापूर या जिल्ह्यातून नामांकित प्रकाशक यांचे स्टॉल ग्रंथमहोत्सवात सहभागी झाले होते. स्टॉलधारकांना ग्रंथमहोत्सव स मितीच्या वतीने विद्युतपुरवठा, पाणी पुरवठा, अग्निशमन दल याचा पुरवठा मोफत केला होता. प्रत्येक स्टॉल उभारणीसाठी 6 हजार रूपये भाडे ठरविण्यात येवून 100 स्टॉलच्या माध्यमातून ग्रंथमहोत्सव समितीला स्टॉलच्या भाड्यापोटी 6 लाख रूपये मिळाले. मंडप उभारणी, कार्यक्रमाचे व्हिडीओ शुटींग, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा व अन्य बाबीसाठी ग्रंथमहोत्सव समितीला 6 लाख रूपये खर्च झाल्याचे समितीचे कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे यांनी सांगितले.


दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेने स्वत: च्या मालकीचे मैदान गेल्या 19 वर्षे मोफत दिले आहे. यामुळे ख-या अर्थाने सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समतीला ग्रंथमहोत्सव यशस्वी पार पाडता आला आहे. ग्रंथमहोत्सवाच्या ठिकाणी यावर्षी प्रथमच झी मराठी वरील लोकप्रिय संभाजी मालिकेतील कलावंतानी प्रत्यक्ष हजेरी लावल्याने त्यांना पाहण्यासाठी नागरिक ांनी तुडूंब गर्दी केली होती. गतवर्षी मात्र जीएसटीमुळे सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव फक्त एक ते दीड कोटी पर्यंतच उलाढाल झाली होती. यावर्षी गुलाबी थंडीतही साहित्याचा आस्वाद ग्रंथप्रेमींनी प्रत्यक्ष हजेरी लावून घेतला आहे.