लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी विविध विभागांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध आहे. या निधीव्दारे जिल्ह्यातील विकास क ामांना अधिक गती प्राप्त होणार असून त्याकरिता अधिकार्यांनी लोकप्रतिनिधीशी चर्चा करुन तात्काळ प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश देऊन जिल्हा अंधत्व व कॅन्सरमुक्त क रण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलावीत अशा सुचना पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बैठकीत दिल्या. मुबंई येथील सह्याद्री अतिथीगृहावर लातूर जिल्ह्यातील विभागप्रमुखाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अर्थसंकल्पपुर्व आढावा घेऊन कोणत्या विभागाला किती विकासनिधी आवश्यक आहे याचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी जी श्रीकांत आणि मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार, , यांची प्रमुख उपस्थिती होती.
लातूर जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी अर्थसंकल्पापूर्वी आढावा बैठक
Reviewed by Dainik Lokmanthan
on
20:14
Rating: 5