Breaking News

साखळीचोरी, घरफोड्या प्रकरणी चौघे अटकेत


ठाणे,  - साखळीचोरी, घरफोड्या प्रकरणी ठाणे पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने चौघांना अटक केली. यदुल्ला कंबरअली जाफरी, महंमदअली नादरअली जाफरी, अनुराग रवी सिसोदिया आणि कलीम नवाब अहमद खान अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 249 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि मोटारसायकल असा एकूण 9 लाख 91 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोनसाखळीबरोबर वाहन चोरणार्‍या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिल्या होत्या. त्यानुसार मालमत्ता गुन्हे कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत चव्हाण यांच्या पथकाने कारवाई करत यांना अटक केली.