एनएसएस शिबिर उद्घाटन व पत्रकारांचा सत्कार,नगराध्यक्ष नामदेव राऊत,कृषी अधिकारी सुपेकर यांचे मार्गदर्शन.
नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या हस्ते सरस्वती पूजन करुन उद्घाटन झाले. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, प्राचार्य चंद्रकांत मोरे, जिव्हाळा वृद्धाश्रमाचे संस्थापक भा.को.साळवे, कर्जत तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष व दै.लोकमंथनचे तालुका प्रतिनिधी सुभाष माळवे, माजी पंचायत समिती सदस्य मारुती सायकर, शिवकुमार सायकर, माजी सरपंच विष्णु सुळ, ग्रामसेवक एन.व्ही.घेरडे, सोमनाथ परकाळे, सुनील खराडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम समन्वयक प्रा.शाहुराव पवार यांनी प्रास्ताविकातुन शिबिरातील उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी बोलताना राऊत म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. शिक्षणातुन संस्कार घडतात, संस्कारातुन उज्वल जीवन घडविता येते. महाविद्यालयीन स्तरावर ध्येय ठरवुन प्रयत्न सुरु ठेवल्यास निश्चितच यश संपादन करता येते. त्यातुनच पुढे सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळते.भा.कों.साळवे यांनी विद्यार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेत शिक्षणातुन सर्वगुणसंपन्न बनण्याचे आवाहन केले.
पत्रकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष मोतीराम शिंदे, ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र अनारसे, तालुकाध्यक्ष सुभाष माळवे, ऑल जरनॅलिस्ट्स ऑर्गनायझेशनचे उत्तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा.सोमनाथ गोडसे, संपादक महादेव सायकर, विजय सोनवणे, किशोर कांबळे, विश्वास रेणुकर, प्रा.राहुल ढवाण, मिलिंद राऊत, संपादक भाऊसाहेब तोरडमल, उपसंपादक भास्कर भैलुमे, प्रा.किरण जगताप आदी पत्रकारांचा भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन प्रा.संदीप काळे, प्रा.किरण जगताप यांनी केले. प्रा.लगड यांनी आभार मानले.प्रा.कुंडलिक बोडरे, प्रा.शिवगुरु व्हंडकर, भगवान काळे, रमेश जंजिरे, अमोल जावळे, विठ्ठल यादव आदी कर्मचाऱ्यांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
