Breaking News

3 अनधिकृत बांधकामे भुईसपाट; 26 जणांवर गुन्हे

पुणे -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाने डिसेंबर महिन्यात शहरातील विविध भागात अनधिकृतपणे चालू असलेली 53 बांधकामे भुईसपाट केली आहेत. यामध्ये 24 हजार 350 चौरस मीटर क्षेत्रफळ मोकळे केले. याप्रकरणी 26 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आगामी काळात अन धिकृत बांधकामावरील कारवाई पालिका वेगात करणार आहे.


21 जुलै 2017 रोजी नगरविकास खात्याने राज्यातील 31 डिसेंबर 2015 पूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याबाबतची अधिसूचना जारी केली. त्यामुळे शहरातील अन धिकृत बांधकामे नियमित होणार आहेत. त्यासाठी सहा महिन्याची मुदत दिली असून तीन महिने संपून गेले आहेत. परंतु, त्या नियमवलीत जाचक अटींमुळे नागरिकांचा बांधकामे नियमित करण्यास प्रतिसाद मिळत नाही. गेल्या तीन महिन्यात पालिकेकडे केवळ सात अर्ज प्राप्त झाले आहेत.


अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाने डिसेंबर महिन्यात शहरातील विविध भागात चालू असलेली 53 अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली आहेत. यामध्ये 24 हजार 350 चौरस मीटर क्षेत्रफळ मोकळे केले. याप्रकरणी 26 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ख्रिसमस, नवीन वर्ष, महाराष्ट्र बंद अशा विविध कारणांमुळे अनधिकृत बांधकामवरील कारवाई थंडावली होती. आता अनधिकृत बांधकामावरील कारवाईला महापालिका वेग देणार आहे.