Breaking News

आमदार मुरकुटेनी केला सोनईत पत्रकारांचा सन्मान


सोनई/ प्रतिनिधी /- समाजातील तळागाळातील घटकांशी जोडलेली पत्रकारांची नाळ व पत्रकारांच्या सुविधासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य नेवासा चे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले.

त्यांनी सोनई प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा मानबिंदू समजून त्यांनी बॅग , पेन, डायरी, व गुलाब पुष्प देऊन सन्मानित केले. त्यावेळी ते बोलत होते आ. मुरकुटे म्हणाले की, समाजातील चांगल्या वाईट गोष्टींचा लेखाजोखा मांडण्यासाठी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून महत्वाची भूमिका म्हणून पत्रकार हा प्रयत्न करत असतो. या अनुषन्गाने सुविधा देण्यासाठी प्रसंगी मंत्रीमंडळात चर्चा घडवून लक्षवेधी प्रश्न उपस्थित करण्याचे सांगितले. या प्रसंगी प्रेस क्लब चे अध्यक्ष नवनाथ कुसळकर, पत्रकार विजय खंडागळे, संजय वाघ, किरण चंदेल, अशोक भुसारी, अमोल चव्हाण, संदीप दरंदले, भाजप चे जेष्ठ कार्यकर्ते बंडू भैया चंदेल सह झापवाडी व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते .