मुंबई, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी स्थापन केलेला भारतीय जनता पक्ष आणि आजचा भाजप यात खूप अंतर आहे. गेल्या काही दिवसात पक्षाच्या काम करण्याच्या पध्दतीत अमूलाघ्र बदल झाल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी आज, मुंबईत केले. जहांगीर आर्ट गॅलरीत आयोजित प्रदर्शनादरम्यान ते बोलत होते.यावेळी सिन्हा म्हणाले की, अनेककार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पक्षातील बदल जाणवत आहेत. यापूर्वी ज्येष्ठ नेत्यांपर्यंत पोहचणे सोपे होते. मात्र, आता ते कठीण झाले आहे. मी स्वत: 13 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटण्यासाठी वेळ मागितला होता. परंतु, अजूनपर्यंत मला त्यांना भेटता आलेले नाही. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवानी यांच्याकाळात एक किंवा दोन दिवसांतच भेटघेणे शक्य होते. हल्लीच महाराष्ट्रात झालेल्या जातीय हिंसेवर सिन्हा म्हणाले की, लोकशाहीत प्रदर्शन करणे बेकायदेशीर नाही. परंतु असे असले तरी कु ठल्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपमध्ये मोठे परिवरे- यशवंत सिन्हा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
15:30
Rating: 5