पंजाब नॅशनल बँकेकडून मुदत ठेवीवरील व्याजदर वाढवले
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेने विविध कालावधीतील मुदत ठेवीवरील व्याजदारात वाढ केली आहे. बँकेने 10 कोटीपर्यंतच्या मुदत ठेवीवरील व्याजदरात 1.25 टक्क्यापर्यंतची वाढ केली आहे. हे नवे व्याजदर 1 जानेवारी 2018 पासून लागू असणार आहेत.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, सात दिवस ते 29 दिवसांपर्यंतच्या एक कोटी रुपयापर्यंतच्या ठेवीवर आतापर्यंत 4 टक्के व्याज मिळत होते. पण आता याच कालावधीसाठी खातेदाराला 5.25 टक्के व्याज मिळेल. तर 30 ते 45 दिवसांच्या ठेवीवरील व्याजदर 4.50 वरुन 5.25 टक्के करण्यात आले आहेत. 46 ते 90 दिवसांच्या ठेवीवर आत्तापर्यंत 5.50 टक्के व्याज मिळत होते. पण आता 6.25 टक्के व्याज मिळेल. तर 91 ते 179 दिवसांच्या ठेवीवर नव्या व्याजदरानुसार 6 टक्क्यांऐवजी 6.25 टक्के व्याज मिळेल.