Breaking News

काश्मीर हल्ल्यात 4 जवान शहीद

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामामधील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रावर रविवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 4 जवान शहीद झाले असून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले. ’जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दोन महिन्यांपूर्वी दहशतवाद्यांनी असाच भ्याड हल्ला केला होता. 



पुलवामा जिह्यात झालेल्या त्या दहशतवाद्यांसोबत चकमकीत एकूण आठ जवान शहीद झाले होते. यामधील 4 जण जम्मू-काश्मीर पोलीस दलातील असून, 4 जण सीआरपीएफचे होते. पहाटेच्या सुमारास काही दहशतवाद्यांनी जिल्हा पोलीस वसाहतीवर हल्ला केला होता. यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांकडून ऑपरेशन सुरू झालं होतं. यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. अवंतिपुरा सेक्टरमधील लेथपोरा भागातील सीआरपीएफ कॅम्पवर फिदायीन हल्ला करण्यात आला होता. 

या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान जखमी झाले असून जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दहशतवादी ट्रेनिंग सेंटरमध्ये लपून बसल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच जम्मू काश्मिर पोलिस आणि सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.