निफाडचा पारा 4.8 अंश, नाशिक 7.2 अंश सेल्सियसवर
नाशिक, दि. 27, जानेवारी - नाशिक जिल्ह्यात थंडीने प्रचंड हुडहुडी आहे. आज मोसमातील सर्वाधिक निचांकी तापमान निफाडमध्ये 4.8 तर नाशिकमध्ये 7.2 एवढे नोंदवले गेले. गेल्या दोन दिवसांपूर्वी नाशिक 11.2 अंशावर होते. मात्र, काल 8.8 अंश सेल्सियस झाले होते. आज मात्र कमालीचा पारा घसरला असून पारा 7.2 अंशांवर स्थिरावला आहे. समुद्रसपाटीपासून निफाड खोलवर जागेवर आहे तसेच परिसराला कालव्यांनी वे त्यामुळे येथील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढलेली असते म्हणून नाशिकपेक्षा निफाडमध्ये थंडीचे प्रमाण अधिक असते.
गेल्या आठवड्यात थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळत तापमान पंधरा अंशापर्यंत खाली गेले होते. मात्र अचानक थंडीत वाढ झाल्याने मोसमातील सर्वाधिक कमी तापमान आज नाशिकसह निफाडमध्ये नोंदवले गेले. मकरसंक्रांतीनंतर थंडी हळूहळू कमी होत गेल्यानंतर पुन्हा पारा खाली घसरल्याने थंडीचा मुक्काम उत्तर महाराष्ट्र व विदर्भात कायम राहिला आहे. मात्र विदर्भातील पारा 8 ते 8 वरुन अचानक 15 ते 15.5 अंशापर्यत गेला. यामुळे या भागातील नागरिकांनी थंडीपासुन मोठा दिलासा मिळाला. तर याच्या नेमकी उलट स्थिती उत्तर महाराष्ट्रात दिसून आली असून यात मोसमातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंददेखील आज झाली आहे.