चांदा ते बांदा योजनेमुळे पर्यटनाला चालना - दीपक केसरकर
सिंधुदुर्गनगरी, दि. 27, जानेवारी - नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपुर वापर करुन यामधून आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने चांदा ते बांदा ही योजना सुरू केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात 43 कोटी रुपये निधी प्राप्त झाला. तर यंदाच्या वर्षी चांदा ते बांदा योजनेअंतर्गत 55 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळत असल्याचे मत सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिना- नि मित्त सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड ग्राउंडवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी केसरकर बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षीतकुमार गेडाम, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. दिलीप पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी विजय जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. आज भारताच्या प्रजासत्ताक दिनाला 69 वर्षे झाली. आजही त्याच उत्साहाने आणि नव्या प्रेरणेने आपण हा दिवस संपूर्ण भारतभर साजरा करतो. परंपरा आणि विस्तृत लोकशाही यांचे नाते सांगणारा हा महनमंगल दिवस आहे. ज्यांच्या त्यागातून आपणाला स्वातंत्र्य मिळाले त्या थोर स्वातंत्र्य सैनिक ांच्या आणि शहिदांच्या प्रती मी प्रथम आदर व्यक्त करुन ते म्हणाले, शासनाने सिंधुदुर्ग व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांसाठी महत्वाकांक्षी व अभिनव अशी चांदा ते बांदा ही योजना सुरू केली आहे. नैसर्गिक साधन संपत्ती या दोन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. या नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर करुन यामधून आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने चांदा ते बांदा ही योजना सुरू केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यात 43 कोटी रुपये निधी प्राप्त झाला. तर यंदाच्या वर्षी चांदा ते बांदा योजनेअंतर्गत 55 कोटी 75 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
चांदा ते बांदा या अभिनव योजने अंतर्गत जिल्ह्यातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात येत आहे. तिलारी येथे वॉटर स्पोर्ट्स, कांदळवन पर्यटन सफारी, कर्ली सारख्या खाडीतून हॉफ न्ड हॉफ बोट आदी पर्यटन सुविधांबरोबरच महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात बारा ठिकाणी काथ्या प्रक्रिया उद्योग सुरू होणार असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, यापैकी तळगाव, हडी, तुळस या ठिकाणचे प्रकल्प पूर्ण झाले असून, सांगेली, परुळे, साटेली-भेडशी, झोळंबे, कोंडुरे, माणगाव, मिठबांव, विलवडे, या ठिकाणच्या प्रकल्पाची कामे लवकरच पूर्ण होतील. या शिवाय पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना याअंतर्गत राबवण्यात येत असून, कृषी यांत्रिकीकरणाचा कार्यक्रमही मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आला आहे. काथ्या उद्योगामुळे जिल्ह्यातील बाराशे वर महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. यंदाच्या वर्षी पाचशे पन्नास महिलांना इलेक्ट्रीक रॅटवर काथ्या वळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात कार्यान्वीत होणार्या बारा प्रकल्पाद्वारे सुमारे दीड हजार महिलांना रोजगार उपलब्ध होईल.