Breaking News

प्रवासी तरुणीवर रिक्षाचालकाचा मित्रांसह सामूहिक बलात्कार; दोघांना अटक

पुणे, दि. 16, डिसेंबर - नातेवाईकांकडे चाललेल्या एका 23 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालक व त्याच्या मित्रांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा येथे घडली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास 3 तरुणांनी या तरुणीवर बलात्कार केला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली असून एकजण फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे तिच्या कुटुंबियांशी भांडण झाल्याने ती घरातून बाहेर पडली आणि नातेवाईकांकडे जाण्यासाठी एका रिक्षात बसली. त्यानंतर क ाही वेळातच रिक्षाचालकाने रिक्षा एका निर्जनस्थळी नेऊन आपल्या दोन मित्रांसह तरूणीवर बलात्कार केला. सतीश जयपाल माने (वय 23), बालाजी मारुती शिंदे (वय 31) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. दोघेही कोंढव्यातील सिद्धार्थनगर येथील रहिवासी आहेत. तर फरार असलेल्या साथीदाराचे नाव अजुनही समजू शकलेले नाही.