धार्मिक स्थळाशेजारील दारू विक्रेत्यावर अखेर पोलिसांची कारवाई
श्रीगोंदा/प्रतिनिधी/- श्रीगोंदा कारखान्यावरील धार्मिकस्थळा शेजारी सुरू असलेल्यादारू विक्री करणाऱ्या दारुविक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी कारखाना परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थानी अर्जाद्वारे श्रीगोंदा पोलिसांकडे केली होती. त्याबाबतचे वृत्त वृत्तपत्रांमधून प्रसारित होताच श्रीगोंदा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तात्काळ त्या वृत्ताची दखल घेत आज पोलिसांना त्या दारुविक्रेत्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पोलिसांनी दारू विक्री करणाऱ्या भुनेश नरसय्या ओलाला (वय 55 वर्षे रा श्रीगोंदा कारखाना, लिंपणगाव) याला दारुविक्री करताना पकडले. त्याच्या दुकानावर आज छापा टाकून सुमारे 4,000रुपये किमतीची आंबट उग्र वासाची 80लिटर ताडी नष्ट केली.आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवैध दारुविक्रेत्यांकडे दुर्लक्ष
अवैध दारुविक्री करणाऱयांवर कारवाई करन्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे. परंतु अ नगर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मात्र श्रीगोंदा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दाविक्रेत्यांकडे दुर्लक्ष होत आहे. श्रीगोंदा पोलिसांना कमी मनुष्यबळा अभावी अशा अवैध दारुविक्रेत्यांवर कारवाई करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अ नगर राज्यउत्पादन शुल्क विभागाने श्रीगोंदा तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे-