प्रांत अधिकाऱ्यांसमोर वाळू तस्करांची हजेरी; त्यामध्ये आमदारांची उपस्थिती
श्रीगोंदा / प्रतिनिधी/- तालुक्यामध्ये बेसुमार वाळू उपसा चालू असताना भीमा नदीकाठी कायमच वाळू तस्करी सुरु आहे. यावर्षी संतोष जगताप यांनी वाळू तस्करीचा लिलाव उचलला. हा लिलाव तब्बल दोन कोटीच्या दरम्यान करण्यात आला. तो सुमारे दोन कोटीच्या आसपास असताना काही प्रेसच्या माध्यमातून लागेबांधे जोडले गेले. यांनी यांचे हात ओले करत प्रशासन काबीज केले. वाळू तस्काराच्या भाऊबंदकीत असताना चक्क प्रांतांना कार्यवाही करावी लागली.
तहसील समोर दोन ठेकेदार त्यांच्या समोर उपस्थित होते. सर्वसामान्याचे प्रश्न अनुउपस्थित असताना वाळू माफियांना अभय दिले कसे ? हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. हे सर्व काही सुरु असताना आमदार राहुल जगताप यांनी कॉलेज तरुणांबरोबर येऊन घोषणाबाजी करत प्रसार माध्यमांना न माहिती देता प्रांतासमोर दबंगगिरी केली. आमदारांचा उनाड स्वभाव बदलणार कधी ? हा आता संशोधनाचा विषय आहे. आमदारसोबत असणारे पदाधिकारी वाळूचे अनधिकृत उत्खनन करत असल्याचे ही लक्षात आले. आंदोलन एक आणि विषय वेगळा यासाठी तर दबंगगिरी केली नाही ना ? हा देखील महत्वाचा विषय आहे.
तालुक्यामध्ये बारा महिने वाळू चोरी केली जाते. त्यामध्ये सर्वसामान्यांना वेठीस धरून घराणेशाहीची राजकीय वाटचाल करणारांना त्याची पार्श्वभूमी माहित असल्यामुळे प्रशासनाचे कवचकुंडले भेदण्याची तालुक्याला चांगलीच माहिती आहे. येथे कुकडी, घोड पाणी प्रश्न लांबच राहिला. परंतु या नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करणे हे अबाधित चालू आहे. सध्या दोन ठिकाणचे लिलाव झाले असताना शेडगाव, पेडगाव,चांडगाव येथून अवैध वाळू उपसावाल्यांनी थैमान मांडले आहे. तहसीलदार महेंद्र माळी यांनी मौन बाळगल्यामुळे प्रांत अधिकारी इतर प्रकरणे मार्गी लावण्यासाठी नाहीतर चक्क तस्कारांसाठी हजर रहात आहेत. अशी सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा चालू आहे.

वाळूचे लिलाव आणि अवैध होणारी वाळू तस्करी याला अभय कोण देणार? असा सवाल सर्व सामान्य जनतेला पडला आहे. सध्या माजी आमदार बबनराव पाचपुते व सध्याचे आमदार राहुल जगताप हे एक मेकांचे श्रेय लुटण्यात मग्न असून तालुक्याला न्याय देणारा कोण ? असणार असेच बोलले जात आहे. सध्या श्रीगोन्द्यामध्ये वाळू तस्करीत सर्वच नेते एकत्र आलेले दिसतात. त्यामुळे लाईट आणि शेतीविषयक संदर्भात दोन्ही नेते कुठल्याच प्रकाराने शेतकऱ्यांची प्रश्न सोडविण्यात यशस्वी नाहीत.तेव्हा हे पाहणे गरजेचे आहे.