Breaking News

ट्रॅक्टर व चारचाकीच्या जोरदार धडकेत दोन ठार



नंदुरबार, दि. 19, डिसेंबर - भरधाव वेगाने ट्रॅक्टर व चारचाकीच्या धडकेत दोन जण जागीच ठार झाल्याची घटना पातोंडा येथे आज घडली असून चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान या धडकेमुळे पेट घेतल्याने चारचाकी चालक गंभीर भाजला गेला आह़े. उद्धव जांभळे (42), रा.शहादा व लताबाई अशोक होळकर (65) रा.नंदुरबार अशी ठार झालेल्यांची नावे आहेत .


अभिजीत जांभळे, स्वाती अभिजीत जांभळे, ट्रॅक्टरवरील अक्काबाई लुकड्या भिल व सुरेखा नितीन कोकणी, रा.नंदुरबार हे जखमी झाले. शहादा येथून जांभळे कुटूंबिय चारचाकीने (क्रमांक एमएच 12 एयू 2679) नंदुरबारकडे येत होते. भरधाव चारचाकी आणि समोरून येणारे विटांनी भरलेले भरधाव ट्रॅक्टर (एमएच 39 एन. 148) यांच्यात पांतोडा ते क ोळदा दरम्यान समोरासमोर धडक झाली. धडक एवढी भीषण होती की चारचाकीचा चक्काचूर होऊन पेट घेतला. जखमींना नंदुरबारातील खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले.
चारचाकीने पेट घेतल्यामुळे उद्धव जांभळे हे भाजले गेले. शिवाय गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यात उपचार सुरू असताना लताबाई होळकर यांचे निधन झाल़े तर गंभीर जखमी अभिजीत व स्वाती या दोघांना धुळे येथील रूग्णालयात हलवण्यात आल़े विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरवर बसलेल्या अक्काबाई लुकड्या भिल (40) रा़ नवापूर चौफुली व सुरेखा नितीन कोकणी (35) रा़ कोकणी हिल नंदुरबार या दोन्ही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.