डेंग्यूचा तिसरा बळी गेल्यानंतर आरोग्य विभागाला जाग
मुंबई : येथील औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी येथे डेंग्यूच्या आजारामुळे तिसरा बळी गेल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली आहे. आरोग्य विभागाची पथके तीन महिन्यानंतर वगरवाडी गावात उपचार व रोगप्रतिबंधक उपाय करण्यासाठी दाखल झाली आहेत.
आरोग्य पथकाने घरोघरी भेटी देऊन पाणी साठवलेले रांजण, टाक्या ग्रामस्थांना रिकाम्या करण्याचे आवाहन केले. या दूषित पाण्यातून अळ्या निघाल्या आहेत. मागील काही दिवसांपासून तापाने फणफणत असलेले अनुष्का शिवाजी पवार, बालाजी बबन विधाटे यांच्यावर हिंगोली, परभणी येथे उपचार करण्यात आले.
वगरवाडी गावात नाले तुंबल्याने येथे डासांचा मोठा प्रादुर्भाव आहे. यामुळे डेंग्यूचा आजार बळावला असल्याचे सांगण्यात येत आहे. राम कैलास नरुके, स्वाती कैलास नरुके आणि शशिकला गुणाजी कच्छवे या तिघांचा टप्प्याटप्प्याने डेंग्यूमुळे मृत्यू झाला.