टवाळखोर तरुण आता पोलिसांच्या 'रडार'वर
अमरावती - मालटेकडी परिसरात एका शाळकरी विद्यार्थिनीवर ॲसिड फेकण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली होती. पोलीस तपासात विद्यार्थिनीवर ॲसिड नव्हे तर गरम तेल फेकण्यात आल्याचे तपासात समोर आले असले तरी या घटनेने महिला, तरुणी व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या प्रश्नांशिवाय शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला होता.
त्याअनुषंगाने आज बुधवारी विविध महिला संघटनांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेवून पोलीस यंत्रणा सज्ज करुन गुन्हेगारी घटनांना आळा घालण्याची मागणी केली. त्यानुसार पोलीस आयुक्तांनी तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश दिलेत. त्यामुळे आता टवाळखोर तरुण पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
