विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास रुजविण्यासाठी यिन हे एक उत्तम व्यासपीठ - बबनराव लोणीकर
सकाळ माध्यम समूहाच्या ‘यिन’चे अधिवेशन यशवंराव चव्हाण सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना श्री. लोणीकर बोलत होते. या अधिवेशनात राज्यातील यिनचे सर्व पदाधिकारी तसेच चार हजार महाविद्यालयांतून निवडलेले महाविद्यालयीन अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, महामंडळ अध्यक्ष, कोअर टीम सदस्य उपस्थित होते.
'यिन' ने राज्यातल्या सर्व महाविद्यालयात निवडणुका घेऊन लोकशाही मूल्य रुजवण्याचे काम हाती घेतले, या निवडणुकीतून पुढे आलेले पदाधिकारी अधिवेशनाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करणार आहेत. यातूनच 'शॅडो' कॅबिनेट तयार केली जाणार आहे. यामुळे निश्चितच युवा पिढी राजकारणाकडे वळेल. असा विश्वास श्री. लोणीकरांनी व्यक्त केला.
या अधिवेशनाबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील राजकीय क्षेत्राबाबत उत्सुकता होती. याला श्री. लोणीकरांनी समर्पक उत्तरे दिली. तसेच त्यांनी किसन मोर्चाच्या प्रसंगीच्या आठवणींना उजळा दिला. सकाळच्या या उपक्रमातून युवा पिढीला निश्चित दिशा व प्रेरणा मिळेल असा आशावाद श्री. लोणीकरांनी व्यक्त केला.
