Breaking News

नागरी संरक्षण दलात १९ आणि २० डिसेंबरला रोजी स्वयंसेवक नोंदणी


नागरी संरक्षण दलाच्या पुणे, नाशिक, उरण, तारापूर, ठाणे व बृहन्मुंबई कार्यालयात स्वयंसेवक निवडण्यात येणार आहेत. यासाठी दि. 19 आणि 20 डिसेंबर 2017 रोजी, नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय आवार, क्रॉस मैदान, धोबी तलाव, मुंबई येथे सकाळी 7.30 ते 5.00 या वेळेत नोंदणी प्रक्रिया स्वयंसेवक म्हणून नोंदणी करता येणार आहे.
नागरी संरक्षण दलात स्वयंसेवक म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्याचे वय 18 वर्षे व किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून उमेदवारांचा पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल असणे आवश्यक आहे. स्वयंसेवक नोंदणीकरिता वयाचा दाखला, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र,आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.

स्वयंसेवकांना मैदानी परीक्षा द्यावी लागणार असून, धावणे चाचणीकरिता पुरुषांनी 1600 मीटर 6 मिनिटे 30 सेंकदात तर महिलांनी 800 मीटर (3 मिनिटे 20 सेंकदात पूर्ण करणे आणि गोळाफेक पुरुषांनी 4.90 मीटर, तर महिलांनी 4.50 मीटर गोळाफेक पूर्ण करावयाचे आहे.) अधिक माहितीकरिता अतिरिक्त नियंत्रक, नागरी संरक्षण, बृहन्मुंबई येथे 022-22013411 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, जास्तीत जास्त स्वयंसेवकांनी नोंदणी करावी असे आवाहन उपसंचालक, नागरी संरक्षण यांनी केले आहे.