Breaking News

ऑनलाइन मतदान घेण्याचा विचार : जे.एस.सहारिया

सोलापूर ; उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरून घेण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने यशस्वीपणे राबवली होती. त्यामुळे आता ऑनलाइन मतदान घेण्याचा विचार आहे. यातील उणिवा दूर केल्या तर शहरी भागातून मतदानाचा टक्का वाढेल, असा विश्‍वास राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी शनिवारी व्यक्त केला.


राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सहारिया पंढरपुरात म्हणाले, सध्या मतदानाची टक्केवारी वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर काही देशांप्रमाणे ऑनलाइन मतदान घेण्याचा विचार आहे. मात्र यात सुरक्षिततेचे उपाय करावे लागतील. 

इंटरनेट हॅकिंग, प्रायव्हसी पारदर्शकतेचे मुद्दे तपासण्याची गरज आहे. नवमतदार वाढवण्यासाठी कॉलेजांत प्रवेशप्रक्रियेच्या वेळी 18 वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून मतदार नोंदणी करू, असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहे. या नवमतदारांना ओळखपत्रेही दिली आहेत.