Breaking News

खोट्या विवरणपत्राद्वारे कर बुडवल्याप्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल

पुणे, दि. 13, डिसेंबर - खोट्या विवरणपत्राद्वारे कमी विक्रीकर देय दाखवून शासनाचा साडेतीन कोटी रुपयांचा विक्रीकर बुडवल्याप्रकरणी अडोर वेल्डींग कंपनीविरुद्ध तक्रार पिंपरी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. मे. अडोर वेल्डींग कंपनीचे व्यवस्थापक मुख्य वित्त अधिकारी गिरीष पाटकर, प्रकल्प प्रमुख उल्हास पुजारी, पीबीई बिजनेस हेड राजेंद्रनाथ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल असून संजय शेडगे (वय 45 रा. धनकवडी ) यांनी तक्रार दिली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2015 ते 2016 या एक वर्षाच्या कालावधीत संबंधित इसमांनी खोट्या विवरणपत्राच्या आधारे खोट्या टॅक्स इन्व्हॉइसद्वारे विक्री देयता कमी दाखवून कर चुकवला तसेच त्यावर 15 टक्के दराने व्याज बुड विण्याचाही प्रयत्न केला. कंपनीकडे तशी खोटी कागदपत्रे आढळून आली असून त्यांनी शासनाची महसूल हानी करुन तीन कोटी 41 लाख 43 हजार 217 रुपयांची फसवूक के ल्याचे उघड झाले आहे.याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.