Breaking News

प्रदुषण समस्या टाळण्यासाठी घनकचर्‍यावर प्रक्रिया आवश्यक - गिरीष महाजन

नाशिक, दि. 01, डिसेंबर - महानगरांमधील प्रदुषण आणि आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी तसेच स्वच्छ, सुंदर व दुर्गंधीमुक्त शहर निर्माण करण्यासाठी घनकचर्‍यावर प्र क्रिया करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले. भारत सरकार महाराष्ट्र शासन आणि नाशिक महानगरपालिका यांनी संयुक्तपणे उभारलेल्या ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 

महाजन म्हणाले, महानगरातील घनकचर्‍याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्‍न वाढत्या शहरीकरणामुळे गंभीर होत चालला आहे. त्यामुळे कचर्‍यापासून पर्यावरणपुरक निर्मिती करण्याचे प्रयत्न शासन करीत आहे. त्यासाठी विविध देशांचे सहकार्य घेण्यात येत आहे. शासनाच्या या प्रयत्नांना नागरिकांची साथ असणे अत्यंत आवश्यक आहे. स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असून नागरिकांनी ओला आणि सुका कचर्‍याचे विलगीकरण करुन कचरा घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन त्यांनी केले.


भविष्यात या कचर्‍यापासून वीज निर्मिती करण्याच्या प्रकविस्तार करण्याचे प्रयत्न करण्यात येतील असेही महाजन म्हणाले. राज्यातील अशा स्वरुपाचा हा पहिलाच प्रकल्प असल्याचे त्यांनी संगितले. भानसी म्हणाल्या, जर्मन सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत जर्मन सरकार व भारत सरकार यांचे संयुक्त प्रयत्नातून नाशिक शहरामध्ये क चर्‍यापासून वीज निर्मिती हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. जर्मनिच्या प्रकल्पाकरिता जीआयझेड जर्मनीकडून तांत्रिक व आर्थिक सहकार्य मिळाले आहे.