Breaking News

ऊस वाहणार्‍या ट्रॅक्टर-दुचाकीचा अपघात, दोघांचा मृत्यू

पुणे , दि. 03, डिसेंबर - बारामती भिगवण राज्य मार्गावर मदनवाडी शिवारात ऊस वाहतूक करणा-या ट्रॅक्टरखाली चिरडून दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांच्या डोक्यावरुन ऊसाच्या ट्रॉलीची चाके गेल्यामुळे मृतदेह ओळखण्याच्या स्थितीत नव्हते.


बाबासाहेब तुकाराम जरे (वय-50वर्षे) आणि मंगेश पांडुरंग गेळे (वय-18वर्षे, दोघेही राहणार पांढरवाडी ता. पाटोदा ) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.बाबासाहेब जरे पिंपळवंडीहून आपल्या दुचाकीवरुन (एमएच-15, सीक्यू-2172) भाचा मंगेश याच्यासोबत माळेगाव कारखान्याकडे ऊसतोडीच्या कामासाठी निघाले होते. मदनवाडी शिवारात हा ॅटेल आनंदसमोर ऊस वाहतूक करणा-या ट्रॅकटरच्या ट्रॉलीला धडकून दोघेही ट्रॉली खाली सापडले. दोघांच्या डोक्यावरुन ऊसाने भरलेल्या ट्रॉलीची चाके गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी संतोष बाबासाहेब जरे यांनी ऊस वाहतूक करणा-या वाहन चालकाविरोधात तक्रार दिली आहे.