Breaking News

दगड खाण कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन

पुणे, दि. 12, डिसेंबर - वाघोली येथील दगड खाण कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे. प्रशासनाने या दगड खाण कामगारांची घरे पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्यांची घरे पाडली जात आहेत. त्यामुळे कामगारांची घरे पाडू नयेत, यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

सरकारकडून या खाण कामगारांना घरे बांधण्यासाठी 1 गुंठा जागा देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्या प्रमाणे या कामगारांना ती जागा देण्यात यावी, तसेच तोपर्यंत घरे पाडण्याचा आदेश मागे घेण्याची मागणी या आंदोलकांनी केली आहे आणि याबाबत जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत बेमुदत अर्धनग्न आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार या आंदोलकांनी केला आहे.

या अर्धनग्न आंदोलनामध्ये दगड खाण कामगार कुटुंबासमवेत आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी या कामगारांनी वाघोली येथे ज्याठिकाणी अ तिक्रमण काढले जात आहे. ती गायरान जागा दगड खाण कामगारांना मिळावी, अशी मागणी केली आहे.