Breaking News

कालव्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्याने शेतकर्‍याचे उपोषण

सिंधुदुर्गनगरी, दि. 13, डिसेंबर - दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे येथील ऊन्नेयी बंधार्‍याच्या उजव्या कालव्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई पाच वर्षे उलटूनही मिळाली नाही. उलट दरवर्षी नुकसान सुरूच आहे. तरीही तिलारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी ढिम्म आहेत. त्यामुळे तेथील शेतकरी फ्रान्सिस लोबो यांनी कोनाळकट्टा येथील कालवा विभागाच्या कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरु केले आहे.

चराठेतील कार्यकारी आभियंता धाकतोडे यांनी 2013 च्या नुकसान भरपाईचा फेरप्रस्ताव पाठवत असल्याने उपोषण मागे घेण्याची विनंती करणारे पत्र कोनाळकट्टा कार्यालय येथील कार्यालय क्र तीनने द्यावे अशी सूचना केल्याने साठे यांनी तसे पत्र लोबो यांना दिले, मात्र त्यांचे समाधान न झाल्याने उपोषण उशीरापर्यंत सुरु होते. लोबो यांच्या उपोषणाला प्रदीप नाईक आणि लॉरेन्स डिसोझा यांनी पाठिंबा दिला.

लोबो यांच्या शेती बागायतीत 2012 पासून उजव्या कालव्याचे पाणी जावून सातत्याने नुकसान होत आहे. सन 2013 मध्ये झालेल्या नुकसानीचा पंचनामा झाला.रत्नागिरीतील अधीक्षक अभियंता कार्यालयात 35 हजार रुपये नुकसानीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. पण त्याबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही.त्यानंतर यावर्षी नोव्हेंबर महिन्यातही मोठे नुकसान झाले. कालव्यात गाळ तुंबुन पाणी अडले गेले आणि कालव्याखालून गळती लागून लोबो यांच्या शेतात आणि घरात रात्रीचे पाणी घुसले.

गाळ काढण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने गाळ गोळा केला पण तो वेळेत उचलला गेला नाही त्यामुळे तो गाळ कालव्यावरुन जाणार्‍या तिलारी बेळगाव रस्त्याच्या मोरीसाठीच्या पाईप मध्ये अडकला आणि सगळे पाणी मागे येवून लोबो यांच्या शेतात आणि घरात घुसले.त्यावेळी संबंधित ठेकेदाराने आर्थिक मदत देण्याची ग्वाही प्रकपाधिकार्‍यांसमक्ष दिली पण अद्याप एक रुपयाही दिला नसल्याचे लोबो यांनी त्या प्रकपाधिकार्‍यांसमोरच आज सांगितले.तिलारी बेळगाव मार्गाजवळ लोबो यांच्या जमिनीलगत तिलारी प्रकल्पाची जमिनही आहे शिवाय त्यांची जुनी इमारतही आहे. 

कालव्यातील गळती लागलेले पाणी त्या जमिनीत घुसून जमीन नापीक बनत आहे.साठे यांनी गळतीचे पाणी रोखण्यासाठी कालव्यालगत गळतीचे पाणी पुन्हा क ालव्यात किंवा गटारात सोडण्याची ग्वाही दिली.दुसरीकडे लोबो यांनी कालव्यावर झाडान्ची खोडे टाकून शेतजमीनीत जाण्यासाठी मार्ग तयार केला आहे.त्या ठिकाणी लोखंडी साक व द्यावा अशी त्यांची मागणी होती.पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे लोबो यांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, कालवा विभाग क्र तीनचे प्रकपाधिकारी सु.ज.वायचळ रजेवर होते त्यामुळे उपोषणकर्त्यांना ठोस आश्‍वासन मिळू शकले नव्हते. केवळ 35 हजार रुपये तुम्हाला नुक सानग्रस्त शेतक-याला पाच वर्षात देता येत नाहीत आणि तुमच्या चराठेतील कार्यालयाच्या नूतनीकरण आणि रंगरंगोटी वर मात्र लाखो रुपये खर्च करता येतात हा विरोधाभास अ धिका-यांच्या भ्रष्ट कारभाराचे प्रतिक आहे.एक तर योग्य नुकसान भरपाई वेळेत द्या अन्यथा आमचे पुनर्वसन करा अशी मागणी लोबो यांनी केली आहे.