Breaking News

जामखेडमध्ये नऊ वर्षांच्या मेहूणीवर आत्याचार

सख्खा नऊ वर्षांच्या मेहूणीवर आत्याचार करून कोणाला सागितले तर गळा दाबून मारून टाकीन अशी धमकी दिली. बायकोच्याच फिर्यादीवरून दत्ता शिवाजी काळे याच्या विरोधात बाललैगिक आत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.


जामखेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जामखेड तालुक्यातील पाटोदा येथील आदिवासी कूटूंब ऊसतोडणीसाठी करमाळा तालुक्यातील चिकलठाण येथे गेले आहे फिर्यादीची नऊ वर्षे वयाची लहान बहीणही बरोबर होती.

दि १३ डिसेंबर रोजी फिर्यादी आपल्या आजारी असलेल्या लहान मूलीला जामखेड येथे दवाखान्यात घेऊन आली तेव्हा आपली लहान बहीण आरोपी नवरा दत्ता शिवाजी काळे याच्याजवळ कोपीवरच ठेवून आली होती. याच संधीचा फायदा उचलत दत्ता काळे याने कोपीतच दहा वाजता आपल्या नऊ वर्षांच्या मेहूणीवर तिच्या इच्छेविरुद्ध आत्याचार केला व गळा दाबत कोणाला सांगितले तर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली.

संध्याकाळी फिर्यादी घरी आल्यावर लहान बहीणीने घडलेली घटना सांगितली संतापून जाऊन बायकोने करमाळा येथून झिरो नंबरने जामखेड येथे पोलीस उपाधिक्षक सोनाली कदम यांना घडलेली घटना सांगितली. सोनाली कदम यांच्यामूळेच हा जामखेड पोलीसांनी दाखल करून घेतला पो काँ चव्हाण यांनी गून्हा दाखल करून घेतला व नंतर ही घटना करमाळा तालुक्यातील असल्याने जामखेड पोलिसांनी पूढील तपासासाठी करमाळा पोलिस स्टेशनला हा गून्हा वर्ग केला आहे