विमा संरक्षणासाठी 31.60 कोटी मंजूर
सिंधुदुर्गनगरी, दि. 03, डिसेंबर - फळपिक विमा योजना 2016-17 अंतर्गत आंबा आणि काजू पिकासाठी विमा संरक्षण घेतलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 7 हजार 796 शेतक र्यांना विमा कंपनीने नुकसान भरपाईपोटी 31 कोटी 59 लाख 97 हजार रुपये मंजूर केले आहेत. सबंधित बँकांकडे ही रक्कम प्राप्त झाली असून लवकरच ती लाभार्थ्यांच्या बँका खाती जमा होणार आहे.
शासनाच्या फळपिक विमा योजनेत आंबा आबी काजू बागायतदारांनी सहभाग घेतला होता. किंबहुना कर्जदार शेतकर्यांसाठी ही योजना सक्तीची होती. मात्र, कर्जदार शेतक र्यांबरोबरच बिगर कर्जदार शेतकर्यांनीही विमा संरक्षण घेतले होते.