Breaking News

29 हजार जणांच्या कर्जमाफीस आले 100 कोटी

सोलापूर, दि. 08, डिसेंबर - राज्य सरकारने दुसर्‍या टप्प्यात जिल्ह्यातील दीड लाखाच्या आतील 51 हजार 700 कर्जदारांना 100 कोटी 36 लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे. यापोटी जिल्हा बँकेला 66 कोटी 80 लाख रुपयांची रक्कम सरकारकडून प्राप्त झाल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापक किसन मोटे यांनी दिली. पहिल्या टप्प्यात बँकेला 31 हजार 925 कर्जदारांचे 170 कोटी 33 लाख रुपये तर कर्ज पुर्नगठित केलेल्या हजार 464 जणांचे 38.31 कोटी रुपये मिळाले होते. 


जिल्हा बँकेबरोबरच राष्ट्रीयीकृत बँकेक डील 11 हजार 820 जणांचे 51 कोटी रुपये संबंधित बँकेकडे वर्ग केले आहेत. कर्जमाफी योजनेतून राष्ट्रीयीकृत बँकेला पहिल्या टप्प्यात हा निधी मिळाला आहे. जिल्हा बँकेकडे दीड लाखाच्या आतील 11 हजार 304 कर्जदारांसाठी 54 कोटी 68 लाख, पुनर्गठितच्या 2601 कर्जदारांसाठी 19 कोटी 61 लाख, प्रोत्साहनपर योजनेतून 15 हजार 67 क र्जदारांसाठी 26 कोटी लाख रुपये मंजूर झाले आहेत. यापैकी जिल्हा बँकेला 66 कोटी 80 लाख रुपये प्राप्त झाल्याचे मोटे यांनी सांगितले. 

दीड लाखाच्या वरील कर्जदारांसाठी अद्याप शासनाकडून कोणतीच रक्कम प्राप्त नसल्याचे सांगण्यात आले. पहिल्या दुसर्‍या टप्प्यात जिल्हा बँकेस दीड लाखाच्या आतील 43 हजार 229 कर्जदारांचे 237 कोटी 21 लाख रुपये मिळाले. पुर्नगठित कर्जाच्या माध्यमातून 10 हजार 65 जणांचे 57 कोटी 92 लाख रुपये मिळाले आहेत. एकरकमी पैसे भरल्यानंतर लाभ दीड लाख रुपयांपेक्षा अ धिक कर्ज असलेल्या कर्जदारांची संख्या 22 हजार 545 आहे. दीड लाखापेक्षा अधिक असलेले कर्ज भरल्यानंतर उर्वरित दीड लाख रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये अद्याप शेतकर्‍यांनी पैसे भरले नाहीत. यामुळे याचे पैसे सरकारकडून मिळाले नाहीत. ही रक्कमही मोठी असल्याचे जिल्हा बँकेकडून स्पष्ट करण्यात आले.