Breaking News

बाळासाहेबांच्या चरित्रपटाचा ट्रेलर 21 डिसेंबरला; नवाजुद्दीन साकारणार भूमिका

मुंबई, दि. 16, डिसेंबर - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित चरित्रपटाचे शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत लिखाण करत आहेत. या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे खा. राऊत यांनी सांगितले.


नेहमीच आव्हानात्मक भूमिका स्विकारणा-या नवाजुद्दीन सिद्दीकीला बाळासाहेबांच्या भूमिकेत दिसणार असल्याने याबाबत उत्सुकता आहे. या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करतेवेळी बा ॅलीवूडचे बादशहा अमिताभ बच्चन उपस्थित रहाणार आहेत. या आधी खा. राऊत यांनी मराठीत बाळकडू हा चित्रपट बनवला होता.