Breaking News

झवेरी बाजारात इमारतीचा स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू

मुंबई, दि. 16, डिसेंबर - येथील झवेरी बाजारातील छिपी चाळीच्या इमारतीत स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. फिरोज वहाब खान (वय 23) व सफरउल्लाख (वय 22) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना आज सकाळी घडली होती.


इमारतीच्या डागडुजीचे काम सुरू असल्याने भाडेकरूंनी घरांचा ताबा सोडला असल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या अधिका-यांनी दिली. पाच मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यावर कंत्राटदाराचे कामगार टेकू लावण्याचे काम करत होते. दरम्यान चौथ्या मजल्यावर स्लॅब अचानक कोसळला. त्यामुळे काम करणारे कामगार थेट ढिगा-याखाली अडकले.