महावितरणच्या अभियंत्यावर हल्ला
महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कुही ग्रामीण शाखेत कार्यरत सहायक अभियंता ब्रिजेशकुमार यादव हे आपल्या कार्यालयीन सहकार्यांसह अनधिकृत वीज जोडणी तपासण्यासाठी परिसरात पाहणी करीत होते. मौज नवरगाव येथे राहणारे सतीश अजाबराव माहुरे यांच्या शेतात आकडा टाकून वीज चोरी असल्याचे महावितरणच्या पथकास निदर्शनास आले.
या पथकाने चौकशी केली , आकडा टाकून वीज घेणे हे बेकायदेशीर कृत्य असल्याचे निदर्शनास आणून दिली. यामुळे चिडल्येल्या सतीश माहुरे याने प्रथम महा वितरण अभियंता यादव यांचेवर दगडफेक केली, नंतर मारहाणीचा प्रयत्न केला आणि अखेर कुर्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
सोबत असलेल्या महावितरण कर्मचारी मदतीला धावले यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेची अभियंता ब्रिजेशकुमार यादव यांनी कुही पोलीस स्थानकात तक्रार दिल्यावर आरोपीच्या विरोधात भादंवि 353,186,504,506 कलमा खाली गुन्हा दाखल केला आहे.