Breaking News

तीन वर्षांनंतरही मोदींची लोकप्रियता कायम

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या सत्तेला तीन वर्ष झाल्यानंतरही नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम असल्याचे एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. या सर्व्हेक्षणात मोदी 88 टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहेत, तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी 58 टक्क्यांसह दुसऱया क्रमांकावर आहेत.


प्यू रिसर्च संस्थेने 2,464 भारतीयांशी संवाद साधून या सर्व्हेक्षणाची आकडेवारी जाहीर केली.21 फेबुवारी ते 10 मार्च दरम्यान हे सर्व्हेक्षण करण्यता आले आहे.या कालावधीत उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या. ‘बहुतांश जनता देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल समाधानी आहे. त्यामुळे मोदींची लोकप्रियता कायम असल्याचे प्यू रिसर्च संस्थेने म्हटले आहे. दर दहापैकी आठ भारतीयांना देशाच्या अर्थव्यवस्थेची चांगली वाटते, अशी आकडेवारी संस्थांनी दिली आहे.