Breaking News

नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे ३.७५ लाख कोटींचे नुकसान

माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सिन्हा यांनी मोदींची तुलना १४ व्या शतकातील दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुघलकशी केली आहे. तुघलकने ७०० वर्षांपूर्वी नोटाबंदी केली होती. त्याकाळी अनेक राजे - महाराजे यांनी आपली मुद्रा आणली. 



काहींनी नवे चलन आणताना आधीच्या मुद्रांचे चलन कायम ठेवले. पण ७०० वर्षांपूर्वी मोहम्मद बिन तुघलकने नवीन मुद्रा आणताना जुन्या मुद्रा संपुष्टात आणण्याची घोषणा केली, असे सिन्हा यावेळी म्हणाले. 

नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे ३.७५ लाख कोटींचे नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘लोकशाही बचाओ आंदोलन'च्या कार्यकर्त्यांनी नोटाबंदी आणि जीएसटीचा प्रभाव आणि अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती यावर सिन्हा यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.