Breaking News

एरंडोल तालुका दुष्काळी जाहीर करा; शिवसेनेची मागणी


जळगाव, दि. 12, नोव्हेंबर - जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात सद्या दुष्काळ परिस्थिती असून पाऊस सुद्धा जेमतेम झालेला आहे त्यामुळे खरीप हंगाम पुर्णपणे वाया गेला असून त्यातील कापूस, ज्वारी, मका, उडीद, मुग आदी पिके शेतक-यांच्या हातातून गेली असल्याने शासनातर्फे एरंडोल तालुका दुष्काळ जाहीर करावा, अशा मागणीचे निवेदन माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या उपस्थितीत तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेतर्फे धरणगाव चौफुलीवर आंदोलन करण्यात आले. यावेळी तब्बल दीड तास वाहतूकीचा खोळंबा उडाला होता.

एरंडोल तालुक्यात यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने तालुक्यातील खरीप हंगामाच्या पिकांची अतिशय केवीलवाणी स्थिती झालेली असून कापूस, ज्वारी, मका, उडीद, मूग यांच्यासारख्या इतर हातातील पिके निघून गेली आहे. त्यामुळे या पिकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे. त्याचप्रमाणे गावांगावांमध्ये आत्तापासून गुरा-ढोरांना चा-याचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न भेडसावत असून दुष्काळसदृश्य परीस्थिती असल्यामुळे तालुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करत काही मागण्याही करण्यात आले.