Breaking News

महाराष्ट्राचा समुद्र किनारा आजही सुरक्षित नाही ....


26/11 ला 9 वर्ष आज पूर्ण झाली पण यानंतरही महाराष्ट्राचा समुद्र किनारा आजही सुरक्षित नाही, काही दिवसांपूर्वी समुद्रात मच्छीमारांच्या बोटवर हल्ला झाला, त्यांचा फोन आणि बायोमेट्रिक कार्ड हिसकवून घेण्यात आलं आहे.

एका मोठ्या दहशतवादी कटाची तयारी सुरू असून अशी माहिती गुप्तचर यंत्रणांमधल्या सूत्रांकडून मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी मच्छिमारांच्या एका होडीवर हल्ला झाला, आणि मच्छिमारांकडचा मोबाईल फोन आणि त्यांचं बायोमेट्रिक कार्ड हिसकवून घेण्यात आलं. तटरक्षक दलाच्या intelligence sharing बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली.

अजून हल्ला झाला नाही म्हणजे भविष्यातही होणार नाही, असं नाहीये.कारण जो फोन आणि बायोमेट्रिक कार्ड हिसकवून घेण्यात आलं, त्याचा गैरवापर होऊ शकतो. नकली बायोमेट्रिक कार्ड बनवून सुरक्षा यंत्रणांना चकवा दिला जाऊ शकतो. किंवा हल्ला करायच्या आधी त्या मोबाईलवरून फोन केले जाऊ शकतात.