Breaking News

महापालिकेवर आंदोलनांचा दबाव कर्मचार्‍यांना वसुलीचे आव्हान

वसुली नसल्याने सुविधांची कायमच वानवा




अहमदनगर/प्रतिनिधी। 26 - सध्या महापालिकेच्या थकबाकीचा आकडा वाढत असून वसुलीशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे मत नुकत्यात एका बैठकीत महापौरांनी व्यक्त केले होते. वसुलीला गती मिळत नसल्याने मनपाला नागरी सेवा - सुविधा देणेही अवघड होताना दिसत आहे. 

त्यातच आता धार्मिक स्थळांवरील कारवाई , शास्तीमाफी, हॉस्पिटल अतिक्रमन, श्‍वांनाचा त्रास, पाणीपुरवठा आदि प्रश्‍नांवर आंदोलनांची संख्या वाढली आहे. यातून तुर्ततरी मनपा प्रशासन गोंधळून गेले आहे. अशा परिस्थितीत सेवा सुरळीत ठेवण्यासाठी वसुलीचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. यातुन प्रशासनावर मोठा दबाव निर्माण होत असुन कर्मचार्‍यांवर विविध कामे पडत असल्याने सर्वत्र अस्थाव्यस्थीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मालमत्ता कराची वसुली त्यातून होणारा खर्च यांचे गणित जुळवताना आयुक्तांसह संपूर्ण प्रशासनाच्या आता नाकीनव येत असुन आयुक्त सुट्टीवर असल्याने अधिकारी वैतागले असल्याचे वातवारण आहे. तसेच वसुलीला पाहीजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचारीही वैतागले आहे. मनपा चालवता येणे सद्यस्थितीत अशक्य झाले असल्याचे चित्र उभे ठाकले आहे. त्यामुळे वसुलीशिवाय कोणताही पर्याय मनपासमोर राहिलेला नाही. 

यावर चर्चा करण्यासाठी महापौरांनी बैठक बोलवून 50 हजार रुपयांचे टारगेटच प्रभागातील कर्मचार्‍यांना दिले आहे.  तर दुसरकीडे न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिकस्थळे काढण्याची घाई प्रशासनाकडून सुरू केल्याने नगरकरांच्या रोषाला अधिकार्‍यांना सामारे जावे जागले आहे. यातच एका अधिकार्‍यांच्या कामावर प्रश्‍नचिन्ह निर्माण करुन बदलीचे सुत्रे हलविण्याची कारवाई सुरु करण्यात आली त्याता प्रभारी आयुक्तांनी नकार दिला. मात्र सर्व होत असताना वसुलीचा प्रश्‍न आ वासून उभाच आहे.