रूग्णांच्या सोयीसाठी तोडली रूग्णालय परिसरातील भिंत
औरंगाबाद, दि. 27, नोव्हेंबर - एका कोपर्यात असलेल्या घाटीच्या वाहनतळामुळे रुग्ण आणि नातेवाईकाना होणारा त्रास आणि रिक्षांच्या बेशिस्तीमुळे होणारी गर्दी यावर वैद्यकीय अधिक्षक भारत सोनवणे यांनी तोडगा काढत परिसरातील मैदानाची भिंतच तोडली. यामुळे रुग्णाना आपघात विभाग आणि बाह्यरुग्ण विभागात जाणे सोईस्कर झाले. शिवाय रस्त्यावरील रिक्षांना देखील उभे राहण्यासाठी स्वतंत्र जागा झाल्याने रुग्णासह, रिक्षाचालकांचाही प्रश्न मार्गी लागला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात रिक्षाचालकांना हाच रिक्षा स्टँड उपलब्ध करुन देण्याची मागणी अनेक वर्षापासून रिक्षा चालक करीत होते. रिक्षांना उभे करण्यासाठी जागा निश्चित नसल्याने रिक्षाचालकाकडून वाटेल त्या ठिक ाणी वाहने उभी करण्यात येत होती. परिणामी घाटी परिसरात प्रचंड गर्दी होत होती. यामुळे येणार्या रुग्णवाहिका, रुग्ण आणि नातेवाईक यांना वाहतुक अडथळ्याला सामोरे जावे लागत होते.
तर दुचाकी आणि चारचाकीसाठी वाहनतळ ईन आऊट गेट जवळ असल्याने बाह्य रुग्ण आणि अपघात विभागात येणार्या हजारो रुग्णांना वाहनतळात वाहने लावून पायपीट करावी लागत होती. या दोन्ही प्रश्नावर तोडगा म्हणून घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक भारत सोनवणे यांनी अधिक्षक कार्यालयासमोरील मैदानाची भिंत तोडुन ती जागा रिक्षाचालक आणि घाटीत येणार्या रुग्ण व नातेवाईकाच्या वाहनासाठी राखीव केली आहे. या निर्णयामुळे रिक्षाचालकांसह रुग्ण आणि नातेवाईकांचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे.