Breaking News

गडाख, परदेशी, गोविलकर, दौंड, बार्नबस यांना साहित्य पुरस्कार प्रदान

अहमदनगर, दि. 07, नोव्हेंबर - साहित्य संमेलनाच्या माध्यमातून संस्कृतीवर प्रेम करणारो लोक एकत्र येऊन चांगल्या विचारांची देवाण-घेवाण होते.त्यामुळेच अशा प्रकारच्या  संमेलनांमधून एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा मिळते. हीच उर्जा भावी काळात अधिक क्षमता मिळवून देते,असे प्रतिपादन अहमदनगरमध्ये आयोजित विभागीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष  प्रा.रंगनाथ पठारे यांनी केले. याच समारंभात माजी खा.तथा साहित्यिक यशवंतराव गडाख,कवी टी.एन.परदेशी,प्रा.डॉ.लिला गोविलकर,डॉ.सरला बार्नबस,कैलास दौंड आदींना साहित्य  पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अहमदनगरमध्ये आयोजित विभागीय साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात प्रा.पठारे बोलत होते.ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे,महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे चे मिलींद दोशी,विनोद कु लकर्णी,प्रकाश पायगुडे,सुनीताराजे पवार,प्रा.डॉ.सु.प्र.कुलकर्णी, विलास गिते,राजन लाखे,स्वागताध्यक्ष नरेंद्र फिरोदिया,जयंत येलूलकर आदि उपस्थित होते.रंगनाथ पठारे  म्हणाले,सातशे वर्षांपासून मराठी माणूस पंढरपूर ला यात्रेसाठी जात आहे.या यात्रे दरम्यानत्यांना मोठ्या प्रमाणावर मिळणारी उर्जा पुढील वर्षभर पुरेल इतकी असते.तशाच प्रकारे सा हित्य संमेलनाच्या या पंढरी मध्ये आलेल्या लोकांना देखील मोठी उर्जा मिळते.ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, यशवंतराव गडाख यांची भाषण झाली.या समारंभात शांतीकुमार फिरोदिया  मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा साहित्य गौरव पुरस्कार यशवंतराव गडाख यांना तसेच कवी टी.एन.परदेशी,प्रा.डॉ.लिला गोविलकर,डॉ.सरला बार्नबस,कैलास दौंड  आदिंना साहित्यरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.जयंत येलूलकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.प्रा.प्रसाद बेडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.