Breaking News

नगरमध्ये 13 नोव्हेंबरला राज्यस्तरीय लोककला महोत्सवाचे आयोजन

अहमदनगर, दि. 07, नोव्हेंबर - लोककला जागृतीचे प्रभावी साधन आहे.तर आपल्या देशाची ती संस्कृती आहे.पुरातन काळापासून अनेक लोककला अस्तित्वाची असल्याचे दाखले  इतिहासात मिळतात. लोप पावत चाललेल्या लोककलांचे जतन करुन त्याला प्रोत्साहन देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.त्या दृष्टीनेच 13 नोव्हेंबर रोजी नगरमध्ये राज्यस्तरीय लोक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती अ‍ॅड.भानुदास होले यांनी दिली.
रयत प्रतिष्ठान व जय युवा स्वयंसेवी संस्थेच्या वतीने 13 नोव्हेंबर(सोमवारी)रोजी होणा-या राज्यस्तरीय लोककला महोत्सवाच्या नियोजन बैठकीत अ‍ॅड. होले बोलत होते. टिळक  रोड येथील माऊली सांस्कृतिक भवन येथे झालेल्या बैठकीप्रसंगी जय युवाचे अध्यक्ष अ‍ॅड.महेश शिंदे रयतचे पोपट बनकर,शाहीर कान्हू सुंबे,बाबासाहेब शिंदे,धीरज ससाणे,नाना डों गरे,अशोक कासार, योगीता देवळालीकर,रजनी ताठे,सलिम सय्यद,मिना म्हसे,जयश्री शिंदे, स्वाती बनकर,दिनेश शिंदे,रेखा नगरे,मंजुश्री रॉय आदिंसह विविध स्वयंसेवी संस्था व  मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.प्रास्ताविकात पोपट बनकर यांनी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था व शासनाच्या विभागाच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरु, लहुजी वस्ताद साळवे  यांच्या जयंतीचे औचित्य साधून टिळक रोड येथील माऊली सांस्कृतिक भवन येथे राज्यस्तरीय लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. अ‍ॅड.महेश शिंदे यांनी  लोककला सादरीकरणासाठी दरवर्षी हक्काचे व्यासपीठ निर्माण करुन, लोप पावत चाललेल्या कलांना प्रोत्साहन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी  सांगितले.लोककलावंताचे प्रश्‍न,समस्या मांडून त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.तसेच शासनाच्या योजनांचा  प्रचार व प्रसार प्रभावीपणे करण्यासाठी लावणी,वाघ्यामुरळी,रायरंद,शाहीर,वासुदेव,नंदीवाले, सनई,आराधी,भारुड कलाकारांचे या महोत्सवात सादरीकरण होणार असल्याचे त्यांनी सां गितले.या महोत्सवात स्वछता हीच सेवा,बेटी पढाओ... बेटी बचाओ,मतदार जागृती, पर्यावरण व स्वच्छता आदी अभियानात उल्लेखनीय कार्य करणार्या स्वयंसेवी संस्थांचा गौरव क रण्यात येणार असल्याचे नाना डोंगरे यांनी सांगितले.या बैठकीचे सुत्रसंचलन धीरज ससाणे यांनी केले.शाहीर कान्हू सुंबे यांनी आभार मानले.