अॅथलेटिक्स स्पर्धेत हर्ष राणाचा डबल धमाका
मुंबई, दि. 06, नोव्हेंबर - इंडिया मास्टर्स अॅथलेटिक्स आयोजित पाच जिल्ह्यांच्या अॅथलेटिक्स स्पर्धेचा पहिला दिवस गाजवणार्या स्प्रिंटर्स स्पोर्ट्स क्लबच्या हर्ष राणाने स्पर्धेच्या शेवटच्या दिवशीही वैयक्तिक दुसरे सुवर्णपदक जिंकून शेवट गोड केला. स्पर्धेच्या तिसर्या दिवशी हर्षने 200 मीटर शर्यत जिंकून पुरुषांच्या गटात वर्चस्व गाजवले.
पुरुषांच्या 200 मीटरच्या शर्यतीत हर्षला आव्हान होते ते 400 मीटर अंतराची शर्यत जिंकणार्या पवई आयआयटीच्या पवन दहियाकडून. पण हर्षने 21 दशांश सेकंदांच्या फरकाने मागे टाकत आपले दुसरे सुवर्णपदक निश्चित केले. हर्षने ही शर्यत 22.34 सेकंदात पूर्ण केली. तर पवनने 22.55 सेकंद अशी वेळ नोंदवली. अचिव्हर्स स्पोर्ट्स क्लबचा प्रथमेश तांडेल 22. 87 सेकंद अशा कामगिरीसह तिसर्या स्थानावर राहिला. वसईला रवी वाल्मिकी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व करणार्या हर्षचा मूळ वयोगट 20 वर्ष आहे. या गटात त्याने जून महिन्यात लखनौ येथे झालेली राष्ट्रीय स्पर्धेतील 200 मीटरच्या शर्यतीत 21.20 सेकंद अशी वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकले होते. आंतर विदयापीठ स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी हर्षने या स्पर्धेत पुरुष गटात धावण्याचा निर्णय घेतला होता. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी हर्षने 100 मीटर शर्यत 10.88 सेकंद अशा कामगिरीसह जिंकली होती.
त्याआधी झालेल्या पुरुषांच्या 400 मीटर अंतराच्या शर्यतीत पवन दुबेने आपले पहिले सुवर्णपदक जिंकले होते. ताईने या शर्यतीत 48.55 सेकंद अशी वेळ नोंदवली. नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिशनचा दिपू नानू 48. 93 सेकंद अशा कामगिरीसह दुसर्या स्थानावर राहिला.फादर अग्नेल जिमखान्याच्या नागेश राजभर ने 49.39 सेकंद अशी वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळवले
इतर निकाल : मुले 18 वर्ष गट : 200 मीटर धावणे : प्रीत सुर्वे (सेव्हन स्टार्स स्पोर्ट्स अकादमी )23 :33 सेकंद. संजय पारेख ( ऐस अॅथलेटिक्स ) 23.39 सेकंद. निनझीर अब्दुल (एनएएसए )23.61 सेकंद. मुले 16 वर्ष गट : 200 मीटर धावणे : सचिन ठाकूर (फादर अग्नेल जिमखाना ) 23.65 सेकंद, प्रथम कोटीयन (फादर अग्नेल जिमखाना ) 23.78 सेकंद, हर्षवर्धन पाठक ( गोल्डन ईगल) 23. 88 सेकंद