Breaking News

ऊसाला ३ हजार ४०० रुपये दर देण्याच्या मागणीसाठी राहुरीत आंदोलन

ऊसाला प्रती टन 3400 रूपये भाव जाहिर करावा या मागणीसाठी नगर - मनमाड राज्य मार्गावर आज सकाळी 10.30 वाजल्यापासुन गुहा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याकडे ऊस घेवून जात असलेले ट्रक, ट्रॅक्टर अडवून वाहनांपुढे ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. 


माहिती मिळताच पोलिस आंदोलनस्थळाकडे रवाना झाले. पोलिसांनी बळाचा वापर अगर दडपण आणल्यास शांततेत सुरु असलेले आंदोल तीव्र करण्याचा संघटनेचा इशारा शतकारी संघटनांनी दिला आहे. 

श्रीरामपुर विभागीय पो.उपअधिक्षक अरुण जगताप,पो.नि.प्रमोद वाघ यांचेसह पोलिस पथक घटनास्थळी हजर स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष रविंद्र मोरे यांचेसह पदाधिकारी शेतकऱ्यांचे नगर मनमाड मार्गावर ठिय्या आंदोलन सुरु राज्यमार्गावर साधारणपणे शेदिडशे ऊसाने भरलेल्या ट्रक व ट्रँक्टर अडविण्यात आले आहेत. श्रीरामपुर विभागीय पो. उपअधिक्षक अरुण जगताप, पो. नि. प्रमोद वाघ यांचेसह पोलिस पथक घटनास्थळी हजर झाले.