Breaking News

प्रलंबित प्रश्नांनासाठी जनतेच्या पाठबळावर लढा उभारणार- गाडे

तालुक्याच्या पश्चिम भागातील के. के. रेंज भागातील धरणग्रतांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. यासाठी सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर आपण लढा उभा करू, असे प्रतिपादन जि. प. सदस्य शिवाजीराव गाडे यांनी केले.


तालुक्यातील वावरथ येथे ग्रामपंचायतींच्या चौदा वित्त आयोगाअंतर्गत निधीतून करण्यात येणा-या कामांचे भूमिपूजन तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरणप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हरीभाऊ जाधव होते.

ते म्हणाले की, वावरथ अंतर्गत खिलारवाडा, हिरामणवाडी येथे पिण्याच्या पाण्याची तीव्रता होती. सदरचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे समाधान असून तालुक्याच्या पश्चिम भागातील जिरायती व दुर्गम भागाचे अनेक प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत. के. के. रेंजच्या विषयाने तर नागरिक भितीच्या सावटाखाली आहेत. अनेक शेतक-यांच्या धरणामध्ये जमिनी जाऊन ते विस्थापित झाले. मात्र त्यांना कोणताही लाभ मिळालेला नाही. पुढील काळात टप्प्याटप्प्यानेहे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून यासाठी सर्वसामान्य जनतेच्या पाठबळाने लढा उभा करणार आहे.

प्रारंभी अण्णासाहेब सोडनर यांनी प्रास्तविक केले. यावेळी उपसरपंच पाटीलबा बाचकर, सरपंच दामू जाधव, पोपट महारनोर, बाळू मधे, दगडू बाचकर, सरपंच भाऊसाहेब जाधव, नारायण शेलार, भिवा तिखोले, सोपान कोळेकर, सखाराम जाधव, तुकाराम जाधव, नामदेव जाधव, मिलिंद दुधावडे, ग्रामसेवक चंद आदी उपस्थित होते.