Breaking News

विहिरीत आढळले एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह

बीड, दि. 02, नोव्हेंबर - गेवराई तालुक्यातील सुशी येथे एकाच विहिरीत एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आले असून यामुळे खळबळ उडाली आहे. सदर कुटुंब हे  उसतोडणीचे काम करणारे होते. गेवराई तालुक्यातील सुशी येथील शेतकरी (ऊसतोड कामगार) तुळशीराम लक्ष्मण पवार वय 32 हे पत्नी जयश्री पवार वय 28 , मुलगा सुरेश वय  7 वर्ष गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या माळरान शेतात रब्बी हंगामातील ज्वारी पिकाची खुरपणी करण्यासाठी गेले होते. ते उशीरापर्यंत परत न आल्याने तुळशीराम पवार  यांचा भाऊ राजेंद्र व इतर लोकांनी शोध घेतला. मात्र काहीच थांगपत्ता लागला नसल्याने गेवराई पोलिस ठाण्यात हे कुटुंब बेपत्ता झाली असल्याची तक्रार देण्यात आली. दरम्यान  पवार यांच्या शेजारच्या शेतात विहरीत मुलाचे सँडल तरंगलेले दिसले विहरीत दोरीच्या साहाय्याने गळ टाकला असता जयश्री पवार यांचा मृतदेह गळाला लागला. यानंतर तुळशीराम  पवार व मुलगा सुरेश यांचाही याच विहरीत शोध घेण्यात आला. मात्र आज तुळशीराम पवार व मुलगा सुरेश यांचा मृतदेह याच विहिरित पाण्यावर तरंगताना दिसला. हा घातपात की  आत्महत्त्या हे स्पष्ट झाले नाही.