Breaking News

नाशिकात राष्ट्रवादी काँग्रेसचे सेल्फी विथ खड्डे

नाशिक, दि. 08, नोव्हेंबर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सेल्फी विथ खड्डे या मोहिमेत नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत. माजी सार्वज निक बांधकाम मंत्री आ.छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील रस्ते चकाचक व खड्डेमुक्त होते. परंतु सत्ता परिवर्तन झाल्यानंतर जिल्ह्यातील रस्त्यांची समस्या अतिशय बिक ट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागातील रस्त्यांवर तयार झालेल्या खड्यांसोबत सेल्फी काढून ते सोशल माध्यमांमध्ये प्रकशित करत रस्त्यांच्या दुरवस्थेवर प्रकाशझोत  टाकला जात आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘खड्डे दाखवा व एक हजार रुपये मिळवा’ असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या  खासदार सुप्रिया सुळे यांनी रस्यावरील खड्यांसोबत सेल्फी घेवून तो फोटो ट्वीटर व फेसबुक पेजवर व्हायरल करत जोरदार प्रतिउत्तर दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा वतीने  सेल्फी विथ खड्डे हि मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेत रस्त्यांवरील खड्यांसोबत सेल्फी काढण्यात येते. हा फोटो सोशल माध्यमांत टाकून राज्याचे सार्वजनिक बांधकाम  मंत्री चंद्रकांत पाटील यांना टॅग केले जाते. यांमुळे हे खड्डे थेट मंत्र्यांना पोहचत आहेत. यासाठी डशश्रषळशीुळींहिेींहेश्रशी हा हॅशटॅग देखील वापरण्यात येत आहे.
गेल्या 3 वर्षांच्या काळात नाशिक जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मोठमोठे खड्डे पडलेल्या  रस्त्यांमुळे अनेक नागरिकांना आपले जीव देखील गमवावे लागले असून याला भाजप - शिवसेना युती सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.  रविंद्र पगार यांनी केला आहे.
सेल्फी विथ खड्डे या उपक्रमांत नाशिक जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभात आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी दत्तक घेतलेल्या अवनखेड या  गावातून जाणार्‍या नाशिक - कळवण मार्गावरील खड्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार व आमदार नरहरी झिरवाळ यांनी कार्यकर्त्यांसह सेल्फी घेतली होती.